मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा आज ५३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण आहे. त्यामुळे शिवसेना मागील ५३ वर्षे राज्याच्या राजकारणात टिकून आहे. भाजपसोबत शिवसेनेची युती जरूर आहे. मात्र शिवसेनेचा स्वतःचा एक वेगळा बाणा आहे. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत्या तलवारी प्रमाणे तळपत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
भाजप सोबत शिवसेनेची युती जरूर आहे. मात्र शिवसेनेचा स्वतःचा वेगळा बाणा आहे. याच निर्धाराने आम्ही येणारी विधानसभा भगवी करू आणि महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असाही निर्धार करू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी एक प्रकारे भीष्म प्रतिज्ञाच केली आहे.
शिवसेना म्हणजे काय आहे हे जगाने मागील ५३ वर्षे अनुभवले आहे. त्यामुळे मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसेनेचा स्थापना दिवस म्हणजे १९ जून हा भाग्याचाच दिवस आहे. याच दिवशी शिवसेना नवसाचे वादळ जन्माला आले. वावटळी येतात जातात. मात्र शिवसेना नामक वादळ गेली ५३ वर्षे महाराष्ट्रात गोगावते आहे. त्या वादळाचा दरारा पाक दिल्ली पर्यंत पोचला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.