बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत दोन विधानसभेपैकी बेलापूर विधानसभा शिवसेना लढविणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे युतीत नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा भाजपा तर बेलापूर विधानसभा सेना लढविणार असल्याचे समोर आल्याने याचा मोठा फटका गणेश नाईक यांना बसणार आहे. नुकतीच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने ते बेलापूर विधानसभेतून लढतील अशी चिन्हे दिसत होती. दुसरीकडे भाजपाच्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे.