धक्कादायक ! मुलाच्या मदतीने सख्ख्या भावाचाच काढला काटा

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून भावाने आपला मुलगा आणि जावयाच्या मदतीने सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीने आपल्या चार बहिणींच्या डोळ्या देखत धाकट्या भावाची हत्या केली. हा हल्ला इतका भयंकर होता की, धाकट्या भावाने जाग्यावरच आपला जीव सोडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव भगवान रामचंद्र बुचडे असून तो करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील रहिवासी आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपी भावाचे नाव भैरवनाथ रामचंद्र बुचडे असे आहे. आरोपी भावाने आपला मुलगा विकास आणि जावई सुधीर थोरात यांच्या मदतीने ही हत्या केली आहे. मागच्या चार वर्षापासून मृत भगवान आणि भैरवनाथ या दोन भावांमध्ये शेतीच्या जमिनीवरून वाद सुरू होता. मागच्या काही महिन्यांपासून या दोघां भावांमध्ये सातत्याने भांडणं होत होते. यातच मृत भगवान यांनी आपल्या घराच्या पाठीमागे गुरांसाठी गोठा बांधायला सुरुवात केली. यामुळे या वादाला पुन्हा तोंड फुटले.

यामुळे दोन्ही भाव एकमेकांच्या अंगावर धावले. त्यामध्ये पुतण्या विकास बुचडे घराकडे धावत गेला. त्याने घरातील धारदार सुरा घेऊन चुलत्याच्या शरीरावर सपासप वार केले. तेव्हा वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महेशवर आरोपी बापलेकांनी हल्ला केला. यामध्ये आरोपीचा जावई सुधीर थोरातने देखील यांना मदत केली. आरोपी बापलेकाने फूटभर लांबीच्या सुर्‍याने भगवान यांच्या छातीसह पोट, कंबर, पाठीवर सपासप वार करून त्यांची हत्या केली.या हल्ल्यात भगवान यांचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार बहिणींच्या डोळ्यादेखत घडला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.