मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्प २०२१ विधानसभेत सादर केला जात आहे. यावेळी महिलांसाठी अनेल विशेष योजनांना प्रधान्य देण्यात आले आहे. बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार असल्याबाबत अजित पवार यांनी घोषणा केली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने खास योजना बनवून शाळकरी मुलींना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अशी माहिती पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.