जुन्या नोटा बदलण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला; 2 लाखाच्या पाचशेच्या बाद नोटा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | चलनातून बाद झालेल्या दोन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या ४०० नोटा चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा निपानी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्यासमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिद्र राठोड (वय २७, रा. रा.डोनगाव तांडा ता. पैठण) याला अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली.

गणेश राठोड हा निपानी भागात व्हिडिओकॉन कंपनीजवळ नोटाबंदीनंतर सरकारने चलनातून बाद केलेल्या नोटा बदली करण्यासाठी घेउन येणार असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास राठोडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या ४०० नोटा (दोन लाख रुपये), एक मोबाईल आणि विना क्रमांकाची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, जमादार अजित शेकडे, पोलीस नाईक रविंद्र साळवे, सोपान डकले, दिपक सुरोशे, संतोष टिमकीकर, आण्णा गावंडे यांनी केली.

या नोटांचे होते तरी काय?

नोटा बंदी नंतर औरंगाबाद जिल्ह्यात चालनातून बाद झालेल्या नोटांची बदली करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या बाद नोटा बदली करून त्याचं करतात तरी काय असा प्रश्न सर्व सामान्यसह पोलिसांना देखील पडला आहे. या मागे रॅकेट सक्रिय आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment