हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेचे 11 हफ्ते देण्यात आले आहेत. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का??? असा प्रश्न शेतकर्यांच्या मनात अनेकवेळा येतो. याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. मात्र, यामागील सत्य असे की त्या दोघांनाही एकत्रितपणे या योजनेचे लाभार्थी होता येणार नाहीत.
हे जाणून घ्या कि, PM Kisan चे अनेक लाभार्थी एकाच जमिनीवर पती-पत्नी दोघांच्या नावे 4000 रुपयांची रक्कम घेत होते. अशा शेतकऱ्यांना सरकारने नोटिसाही पाठवल्या आहेत.अशा अनेक प्रकरणात सरकारने शेतकऱ्यांवर कारवाईचे आदेश देखील दिले आहेत.
जर कोणी फसव्या मार्गाने या योजनेचे पैसे घेताना आढळले तर त्याच्याकडून सर्व हप्ते वसूल केले जातील, अशी स्पष्ट सूचना सरकारने दिली आहे. यामध्ये अशा लोकांचाही समावेश आहे ज्यांनी पती-पत्नी दोघांच्या नावावर हप्ता घेतला आहे. याशिवाय, सरकारने ठरवून दिलेली अनेक मानके आहेत, ज्यांची पूर्तता न करणाऱ्या लोकांकडून पैसे वासून केले जातील. PM Kisan
PM Kisan सन्मान योजने विषयी जाणून घ्या
या योजने अंतर्गत, शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयेदि ले जातात. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. मात्र, ही रक्कम फक्त अशाच शेतकऱ्यांना मिळेल ज्यांचे उत्पन्न एका मर्यादेपेक्षा कमी आहे. याशिवाय असे अनेक घटक आहेत जे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभार्थी होण्यापासून रोखू शकतात.
कोणते शेतकरी PM Kisan सन्मान निधीसाठी पात्र नाहीत
संस्थागत जमीनधारक, सरकारी शेतजमीन असलेले शेतकरी, कोणतेही ट्रस्ट फार्म आणि सहकारी शेततळे इत्यादी या योजनेतून बाहेर आहेत.
अशी शेतकरी कुटुंबे ज्यांच्या घरात पूर्वी किंवा सध्या घटनात्मक पद आहे.
खासदार आणि आमदारांचाही या योजनेत समावेश नाही. राज्य विधान परिषद सदस्य, महानगरपालिकांचे आजी-माजी महापौर आणि जिल्हा पंचायतींचे माजी आणि सध्याच्या अध्यक्षांचे कुटुंब.
केंद्र किंवा राज्य सरकारे, कार्यालये आणि विभागांचे सध्याचे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी.
केंद्र किंवा राज्य सार्वजनिक उपक्रम आणि केंद्राच्या अंतर्गत संलग्न कार्यालये किंवा स्वायत्त संस्थांचे वर्तमान किंवा माजी अधिकारी.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी. तथापि, मल्टी-टास्किंग कर्मचारी, वर्ग IV किंवा गट डी कर्मचारी या योजनेचा भाग असू शकतात.
10,000 रुपये किंवा त्याहून अधिक मासिक पेन्शन मिळवणारे.
ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षांत इन्कम टॅक्स भरला आहे.
इंजिनीअर, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट आणि इतर व्यावसायिक संस्थांमध्ये रजिस्टर्ड व्यक्ती यासारखे इतर व्यावसायिक देखील या योजनेचा भाग होऊ शकत नाहीत. PM Kisan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/
हे पण वाचा :
Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या
Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर तपासा
Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!
EPFO : नोकरी बदलल्यानंतर अशा प्रकारे नवीन खात्यात PF चे पैसे कसे ट्रान्सफर करा