हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रेमप्रकरणे काही नवीन नाहीत. अनेक मुले मुली रिलेशनशिप (Relationship) मध्ये असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना सुद्धा अनेकांना दिसतात. कधी कधी स्वतःवरचा ताबा जाऊन भर सार्वजनिक ठिकाणी एखादे कपल एकमेकांना किस (Kiss) करताना सुद्धा आपण अनेकदा पाहतो. मात्र जर कोणत्या पोलिसाने तुम्हाला किस करताना पहिले तर तुमची नक्कीच भंबेरी उडेल आणि अशावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न तुमच्या मनात येईल. परंतु चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला याबाबतच काही कायदेशीर बाबी सांगणार आहोत.
खरं तर सार्वजनिक ठिकाणी किस करू नये असं कुठं आपल्या कायद्यात (Law) लिहिलेलं नाही. परंतु पोलिसाना जर लग्न न झालेल्या कपल किस करताना दिसलं तर अशा स्थितीत पैसे कमवण्याची आयती संधी त्यांना मिळण्याची शक्यता असते. आणि लोकसुद्धा पोलिसांना पैसे देण्याची तयारी दर्शवतात कारण त्यांना कायद्याची माहितीच नसते.
पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता कमीच असते, तरीही पोलिसांनी कारवाई केलीच तर ते २९४ कलम दाखल होण्याची शक्यता असते आणि तुम्हाला जेलमध्ये टाकण्याची आणि मग कोर्टातून जामीन घेण्याची धमकी पोलीस देतील. खरं तर पोलिसांना अशा प्रकरणात आरोपीला स्टेशनमधून सोडावं लागत. यावेळी जरी पोलीस तुम्हाला म्हणाले कि जामिनासाठी घरातील कोणत्यातरी व्यक्तीला घेऊन या तरी अशा प्रकरणात घरातील कोणाला आणण्याची काहीच आवश्यकता नसते, तुम्ही तुमच्या मित्राला घेऊन गेलात तरी चालते.
मुख्य म्हणजे जेव्हा कोर्टात ही केस जाते तेव्हा कोर्टाला सुद्धा माहित आहे कि सार्वजनिक ठिकाणी किस करणे म्हणजेच खूपच मोठा गुन्हा वगैरे नाही त्यामुळेकोर्टातही तुम्ही दंड भरून सुटू शकता. त्यामुळे जरी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किस करताना कोणाला सापडला आणि पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला तरी घाबरण्याचे कारण नाही.