व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सीबीआयने देशमुख यांच्यावर कारवाई केली असून त्यांना नुकतीच अटक केली आहे.

दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना कारागृहामध्ये चालताना पडल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात होता. मात्र, देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे सीबीआयकडून देशमुख याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. दरम्यान आज सीबीआयकडून देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

शंभर कोटी प्रकरणी सीबीआयकडे कस्टडी देण्याच्या निर्णयाबाबत आव्हान देण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, याचिका ऐकण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्तींनी याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर तत्काळ कारवाई करत सीबीआयकडून देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले.