हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अलीकडेच केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये अनेक बदल केले. केंद्राद्वारे अधिसूचित केलेले हे नवीन मोटार वाहन नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात येत आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयटी सर्व्हिसेस आणि इलेक्ट्रॉनिक मॉनिटरींग (E-Monitoring) च्या माध्यमातून देशभरात वाहतुकीचे नियम चांगल्या प्रकारे लागू करता येतील. या नवीन नियमांनुसार, आता फक्त कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही. याद्वारे, लोकांना आता रस्त्यावर थांबवून कागदपत्रे तपासायचा त्रास आणि पेचातून मुक्त होतील.
आता तपासणीसाठी फिजिकल डॉक्युमेंट्सची मागणी केली जाणार नाही
या नवीन नियमांनुसार, कोणत्याही वाहनाचे डॉक्युमेंट्स कमी किंवा अपूर्ण असतील तर डॉक्युमेंट्स त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरद्वारे ई-व्हेरिफिकेशन केली जातील आणि ई-चलान (E-Challan) पाठविले जाईल. म्हणजेच आता वाहने तपासण्यासाठी फिजिकल डॉक्युमेंट्सची मागणी केली जाणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की जर वाहनांच्या डॉक्युमेंट्सची फिजिकल तपासणी केली गेली नाही तर मग वाहनाचे कोणतेही डॉक्युमेंट्स एक्सपायर झाले आहे कि नाही हे आपल्याला कसे समजेल?
ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल पोर्टलवर नोंदविली जाईल
मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की लाइसेंसिंग अथॉरिटीकडून अपात्र किंवा निरस्त ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving License) डिटेल पोर्टलमध्ये नोंदविली जाईल, जो वेळोवेळी अपडेट केले जाईल. हे अपडेट केले गेलेल्या डेटा पोर्टलवर दिसून येईल. डॉक्युमेंट्सची माहिती अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वैध असल्याचे आढळल्यास फिजिकल डॉक्युमेंट्सची तपासणी करण्याची मागणी केली जाणार नाही. यात ड्रायव्हरने उल्लंघन केल्याची प्रकरणे देखील समाविष्ट असतील ज्यामध्ये डॉक्युमेंट्स ताब्यात घ्यावे लागते.
आपल्या वाहनांच्या डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिकली मेंटेन करा
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, आता वाहन मालकांना रस्त्यावर थांबण्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपली डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणे आवश्यक असेल. जर आपल्याला सोप्या भाषेत समजायचे असेल तर वाहन संबंधित लायसन्स, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट्स यासारख्या आवश्यक डॉक्युमेंट्सची पूर्तता सरकारी वेब पोर्टलवर करता येईल. कंपाऊंडिंग, इंम्पाउंडिंग, एन्डोर्समेंट, लायसन्स सस्पेंशन आणि रिव्होकेशन, रजिस्ट्रेशन आणि ई-चलान जारी करणे देखील इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे शक्य होईल.
अशा वाहनचालकांच्या वागण्यावर वाहतूक विभाग नजर ठेवेल
वाहतूक विभाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंद ठेवेल. याद्वारे ड्रायव्हरच्या वागण्यावरही नजर ठेवता येईल. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, पोर्टलवरील रद्द केलेला किंवा अपात्र वाहन चालविण्याचा लायसन्सची नोंद वेळोवेळी अपडेट केली जाईल. यामुळे अधिकाऱ्यांना ड्रायव्हरच्या वागण्यावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. नियमांनुसार, वाहनाशी संबंधित कोणत्याही डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय केले गेले असेल तर पोलिस अधिकारी त्याची फिजिकल कॉपी विचारू शकत नाहीत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.