ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून संपूर्ण जगभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतातही हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा म्हणून राज्यांना पत्र लिहिलं असून काही सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना चाचण्या आणि रुग्णांवर लक्ष ठेवा. याशिवाय रात्रीचा कर्फ्यू लागू करणे, मोठ्या मेळाव्यांवर बंदी घालावी, लग्न, अंत्यविधींमधील लोकांची संख्या मर्यादित करणे यासारखी पावलं उचलली जावीत.

कंटेनमेंट झोनची मर्यादा निश्चित करणे, कोरोना प्रकरणांचा सातत्याने आढावा घेणे, रुग्णालयांमधील सुविधा वाढवणे आणि त्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्लाही केंद्राने दिला आहे. सर्व राज्यांना बेडची संख्या वाढवणे, रुग्णवाहिका आणि इतर यंत्रणा वाढवणे आणि ऑक्सिजन आणि औषधांचा बफर स्टॉक वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे

घरोघरी जाऊन कोरोना केसेस शोधणे, तसेचआरटी पीसीआर चाचण्यांची संख्याही वाढवायला हवी असा सल्ला केंद्राने दिला आहे तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवरही जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे.मार्गदर्शक तत्त्वांनुसार, होम आयसोलेशनचे नियम काटेकोरपणे पाळणे. १०० % लसीकरणावर जोर देण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे.