केंद्र सरकारने MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर यावी यासाठीच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत. याच संदर्भात पृथ्वीराज बाबांनी आज एक tweet करीत केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार द्यावेत असं चव्हाण यांनी म्हटले आहे.

निर्मिती क्षेत्रात लाॅकडाऊन मुळे गंभीर आर्थिक संकट चालू आहे. कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीत. बँक कर्जाने अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. केंद्राने ताबडतोब रोख खर्चाचे stimulus पॅकेज जाहीर करून व इतर राष्ट्रांप्रमाणे #MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार दिले पाहिजेत असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेव्हा केवळ बँकांनी दिलेल्या कर्जाने अर्थव्यवस्थेचे चक्र पुर्वपदावर येणार नाही. यासाठी केंद्र सरकारला काही पावले उचलावी लागतील. इतर राष्ट्रे अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी काय करत आहेत याचा अभ्यास करुन सरकरने काही योजना आखणे गरजेचे असल्याचे मत यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment