या घरगुती उपायांचा वापर करून जास्त काळ टिकवून ठेवा धान्य आणि कडधान्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वयंपाक घर जर स्वच्छ असेल तर त्या घरातील कोणत्याही व्यक्तीला साध्या आजरापासून दूर राहण्यास मदत होते. त्यासाठी घर आणि घरातील जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच आपल्या आहारात येणाऱ्या सर्व भाज्या आणि कडधान्ये याचा समावेश असणे गरजेचे आहे. स्वयंपाकघर, किचन प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याबाबत काही महत्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत .

काय घ्यावी काळजी —

— तांदुळ आणि गव्हाच्या पोत्यात चुन्याचा चुरा कपड्यात बांधून ठेवावा, त्याने कीड नाही लागत. आणि कोरडेपणा राहतो.

— चुन्याऐवजी लाल मिरच्याही ठेवता येतील.

— धान्य किंवा डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांमध्ये कडुनिंबाचा पाला सुकवून ठेवावा. त्यामुळे तिथे कीड लागत नाही.

— धान्य साठवताना नेहमी काही प्रमाणात किडीला निर्बंध असणारी पावडर टाकावी.

— कच्ची केळी ,फणस, सुरण आणि इतर कंदमुळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही.

— फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील.

— फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल, तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे दुर्गंध निघून जाईल.

— काही प्रमाणात कडुलिंबाचे पावडर टाकून त्यामध्ये मीठ याचे प्रमाण ठेवून ते हवाबंद ठेवावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment