अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ‘ही’ आहेत कारणं, जाणून घ्या त्याबद्धल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना अर्धशिशी याचा त्रास असतो. कामाच्या व्यापामुळे, दररोज होणाऱ्या धावपळीमुळे, तसेच वेळेत आहार न घेतल्याने आणि पुरेशी झोप न झाल्याने डोकेदुखी सारखा आजार उध्दभवतो. जगातल्या १५ ते २० टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही जास्त असतो. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्या लोकांना ठराविक काळानंतर हा त्रास होतच राहतो. पण हा त्रास मागे लागलेला असला, तरी जीवनशैलीत काही छोटे बदल करून या त्रासावर नियंत्रण मिळवता येतं. तसेच यावर मेडिकल मधून कोणताही उपचार मिळत नाही.

कारणे —

— अर्धशिशीच्या सामान्य लक्षणांमध्ये डोक्याचा संपूर्ण भाग किंवा अर्धा भाग दुखतो. त्याच्या त्रासाने झोप सुद्धा लागत नाही. ऊन, कर्कश आवाज, दुर्गंध, मळमळ किंवा उलट्या यांसारख्या संवेदनक्षमतेशी संबंधित गोष्टींमुळे अर्धशिशीचा त्रास होतो.

— फ्रिज, मायक्रोवेव्ह आणि रेडीमेड प्रकारचे पदार्थ खाल्यामुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो. त्यासाठी शक्यतो विकत च्या पदार्थांचा समावेश आहारात केला जाऊ नये.

— चायनीज अन्न ज्यामध्ये अजिनोमोटो आणि मोनोसोडियम ग्लूटामेट, खूप चीज, डार्क चॉकलेट असते त्यामुळेही अर्धशिशीचा त्रास निर्माण होऊ शकतो तसेच वाढू शकतो.
— सतत डोक्यावरुन आंघोळ केल्याने सुद्धा हा अर्ध शिशीचा त्रास होण्यास सुरुवात होते.

— एसीमध्ये खूप काळ बसल्यानेही अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.

–अनियमित मासिक पाळीमुळेही स्त्रियांमध्ये अर्धशिशीचा त्रास वाढतो.

— आहारात थंड पदार्थांचा समावेश करू नये.

— जास्त काळ स्क्रीन च्या समोर बसल्याने सुद्धा अर्धशिशीचा त्रास होण्यास सुरुवात होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.