हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान न्यायमूर्ती कैलास चांदीवाल आयोगाने त्यांच्या आरोपांच्या चौकशीचा तयार केलेला २०१ पानांचा अहवाल आज सादर केला आहे. तो राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात परमबीर सिंह यांनी राज्य सरकार व देशमुख यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे देशमुख यान क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्बद्वारे राज्य सरकार व अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंटमधून तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दरमहिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप सिंह यांनी पत्रातून केला होता.
त्यानंतर देशमुखांना आपला गृहमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तर सिंह यांच्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने सिंह यांनी केलेल्या आरोपाची तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या साक्षीदाराची चौकशीही केली. त्यानंतर अखेर आयोगाने सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे अहवालातून सांगितले आहे. त्यामुळे चांदिवाल आयोगाचा अहवाल अनिल देशमुख यांच्यासाठी सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे.