“सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील”; चंद्रकांतदादांचा शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊ शकत नाही. शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत आहे. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचे नेते हुशार आहेत. संजय राठोडांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केले तर राठोडांचा राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची चौकशी सुरू होताच त्यांचा राजीनामा घेतला.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाही? शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा का होत नाही? याचा शिवसेनेने विचार करावा. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. किमान समान कार्यक्रमात एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत हे त्यांनी ठरवलं आहे. शिवसेना त्या सत्तेत आहेत. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील, असेही पाटील यांनी म्हंटले.

शिवसेना प्रमुख ठाकरे यांची भाषणे ऐकवणार – चंद्रकांत पाटील

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुखांबद्दल महत्वाचे व्हिधान केले. यावेळी ते म्हणाले की, 1993 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषणं केली ती सर्वांना माहीत आहे. येत्या काळात आम्ही ही भाषणं ऐकवणार आहोत. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. आताही शिवसेना हीच भूमिका घेणार का हा प्रश्न आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Comment