“आमदारांना घर हवंच कशाला?, आमदार होण्यासाठी कुणी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता”; चंद्रकांतदादांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असे जाहीर केले. त्यांच्या आमदारांच्या घरावरून आता विविध आमदार, नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सरकारला सवाल केला आहे. “आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. कुणी आमदार होण्यासाठी कुणी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता, आमदारांना घर हवंच कशाला?; असा सवाल पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. चार कोटीचा आमदार निधी दिला. तो आधी मुळात दोन कोटी होता. कोविड असतानाही चार कोटी केला. आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे पगार वाढवले. सहाय्यकचे पगार वाढवले. घरे देणार. कशासाठी पाहिजे घरं?, असा सवाल करतानाच आमदार व्हा म्हणजे तुम्हाला घरं मिळतील.

मला मुंबईत घर नाही तरीही मला जे घर देणार आहात ते देऊ नका. तेच पैसे शेतकऱ्यांना द्या. एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या. माझ्या सारखे आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाचे चार चार घरे आहेत. क्षमता आहे. पाच कोटींचा निधी मिळेल, असा कुणी काही आमदार होण्यासाठी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता. आमदारांचा रोष पत्करून हे मी बोलत आहे.

Leave a Comment