पिकअप गाडीचा भीषण अपघात ! लहान चिमुरड्यांसह 11 प्रवासी गंभीर जखमी

0
59
chandrapur crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एका पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात हा अपघात घडला आहे. या पिकअपमधील प्रवासी ओदिशाहून कामानिमित्त निघाले होते. यावेळी कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला.

कशा प्रकारे घडला अपघात ?
या पिकअप गाडीतील नागरिक ओदिशा राज्यातून करीमनगर येथे कामानिमित्त निघाले होते. या दरम्यान आकापूर जवळील वळणावर पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हि पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत ओदिशा येथील कामगार महिला पुतना गजपती धरोहा हिचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सामान्य जिल्हा रुग्णालय चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले.

आकापूर वळणावर रिफ्लेक्टर लावण्यात आले नसल्याने नव्या चालकांना अडचण येत असल्याची मागणीकरूनसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने या रोडवरील अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here