“त्याने कधीच भविष्यवाणी…”; पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भविष्यवाणी वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका चांगलीच रंगली आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि भाजपमधील नेत्यांत एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती,” असं आव्हाडांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी पोपटाला आपल्या हातावर घेण्याचा प्रयत्न करत असताना तो मात्र येत नसल्याचं दिसत आहे. तेथील कर्मचाऱ्याने प्रयत्न करुनही तो पोपट मोदींकडे जात नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या जुन्या व्हिडीओवरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांमध्ये वाद होणार यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच थेट निशाणा साधला आहे.