हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. 3 फेबृवारी 2019 ते 7 जानेवारी 2020 दरम्यान भरत नाट्य मंदिर पुणे, सायंटिफिक सभागृह, नागपूर, डॉ. काशिनाथ घाणेकर (मिनी) नाट्यगृह, ठाणे आणि रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे आयोजित या स्पर्धेत एकूण 57 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते.
‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाला निर्मितीचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले असून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना जाहीर झाले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अजय धवने-आशिष अम्बाडे निर्मित या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्यपदक नूतन धवने यांना, तर अभिनय गुणवत्ता पुरस्कार रोहिणी उईके यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक हेमंत गुहे यांना, तर सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे प्रथम पारितोषिक पंकज नवघरे, तेजराज चिकटवार यांना जाहीर झाले आहे.
सर्वोत्कृष्ट रंगभूषेचे प्रथम पारितोषिक मेघना शिंगरू, बबिता उईके यांना जाहीर झाले असून, सर्वोत्कृष्ट नाट्य लेखनाचे प्रथम पारितोषिक या नाटकाचे लेखक निरंजन मार्कंडेयवार यांना जाहीर झाले आहे. या नाटकाने राज्यात प्रथम येत चंद्रपूरची मान पुन्हा एकदा राज्यात उंचावली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.