WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

WhatsApp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp चा वापर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या देशांच्या लिस्टमध्ये आता भारताचे नावदेखील सामील झाले आहे. यासाठी आपल्या अनेक प्रकारचे UPI Apps देखील आहेत. मात्र आज आपण WhatsApp च्या मदतीने आपला UPI पिन कसा बदलावा याची माहिती जाणून घेणार आहोत.

How to get UPI PAYMENT in WhatsApp! [WORKING]???? - YouTube

UPI पेमेंट सिस्टीम म्हणजे काय ???

हे लक्षात घ्या कि, 2020 मध्ये UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसला नॅशनल पेमेंट ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित करण्यात आले. याच्या मदतीने आपल्याला एका मोबाईल वॉलेटद्वारे दुसऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता येतात. याच्या मदतीने कधीही कुठूनही आर्थिक व्यवहार करता येतात. आता WhatsApp मध्येदेखील हे फीचर देण्यात आले आहे.

Exclusive: Finally, WhatsApp UPI opens for masses

Android स्मार्टफोनवर WhatsApp द्वारे UPI ​​पिन कसा बदलायचा ते पहा

सर्वांत आधी WhatsApp उघडा आणि मेनूमधून “More Options” निवडा.

तुमचे बँक खाते निवडा.

“Change UPI PIN” किंवा “Forgot UPI PIN” वर जा.

आता UPI पिन बदलण्यासाठी सध्याचा पिन टाइप करावा लागेल, त्यानंतर नवीन पिन जनरेट करण्याचा पर्याय दिसेल.

जर पिन आठवत नसेल तर पुढे जाण्यासाठी “Continue” बटणावर क्लिक करा. त्यानंतर बँकेशी संबंधित काही माहिती विचारली जाईल, ज्यानंतर नवीन पिन तयार करण्याची परवानगी मिळेल. यानंतर आपला नवीन पिन सहजपणे तयार करता येईल.

iPhone वर WhatsApp द्वारे UPI ​​पिन कसा बदलायचा ते पहा

जर आपल्याकडे iPhone असेल, तर आपल्याला देखील Android युझर्ससाठी दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील. ज्या फॉलो करून सहजपणे नवीन पिन तयार करता येईल.

Accept payments in the WhatsApp with Tap2Pay

WhatsApp द्वारे पेमेंट सुरक्षित आहे का ???

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बाजारात Google Pay, PhonePe, Paytm, Bharat Pay आणि इतर बँकांचे स्वतःचे पेमेंट Apps उपलब्ध आहेत. या Apps वरून कोणतेही ट्रान्सझॅक्शन केल्यास आणि त्यामध्ये काही अडचण उदभवल्यास सदर कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर काही वेळाने आपली समस्याही दूर होईल. जर WhatsApp Pay द्वारे ट्रान्सझॅक्शन केले आणि आपले पैसे खात्यातून डेबिट झाले मात्र परत खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर हे लक्षात घ्या कि, यासाठी WhatsApp कडून कस्टमर सपोर्ट दिला जात नाही. यासाठी आपल्याला संबंधित बँकेशी संपर्क साधावा लागेल. अशा परिस्थितीत आपली फसवणुक केली जाऊ शकेल. तसेच जर कोणी यासंबंधित लिंक पाठवली असेल तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका अन्यही आपल्या खात्यातून पैसे कापले जाण्याचा धोका असेल. अशा परिस्थितीत WhatsApp कडून कोणतीही जबाबदारी घेतली जाणार नाही. यासाठी हे पेमेंट करताना हे App आपल्याला सावधगिरीने वापरावे लागेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/payments/in

हे पण वाचा :

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा

UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी