Wednesday, February 1, 2023

राजकारणात सुडाच्या भावनेने वागू नये, महाराष्ट्राची ही परंपरा नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना सल्ला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होय, मी बदला घेतलाय, असे एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राजकारणात सुडाच्या भावनेने वागू नये. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. राजकारणात बदल्याच्या भावनेने कुणीच वागू नये. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. इतर राज्यात असे राजकारण होत असेल. मात्र, महाराष्ट्रात अशा राजकारणाला स्थान नाही. महाराष्ट्राची हि परंपरा नाही. ती सर्वांनीच जपली पाहिजे, असा सल्ला भुजबळांनी दिला.

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजकारणात बदल्याच्या भावनेने कुणीच वागू नये. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. इतर राज्यात असे राजकारण होत असेल. मात्र, महाराष्ट्रात अशा राजकारणाला स्थान नाही. महाराष्ट्राची परंपरा सर्वांनीच जपली पाहीजे. सत्ताधाऱ्यांनी चांगले काम केलेल तर आम्हीही सत्ताधाऱ्यांसोबत आहोत.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांवर अतिशय चुकीच्या पद्धतीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीमध्ये हाताला हात लागतोच. अशा पद्धतीने तर मुंबईत लोकलमध्ये, बाजारात रोज लाखो विनयभंगाच्या घटना घडत असतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून काही फुट अंतरावर ही घटना घडली. पोलिसही तेथेच होते. अशा वेळी तेथे एका आमदाराने महिलेचा विनयभंग केल्याचे म्हणणे चुकीचे आहे, असे भुजबळ यांनी म्हंटले.