हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाश्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबरमध्ये नियमित गाड्या सुरू होणार नाहीत. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप माल यांनी सीएनबीसी-आवाज यांना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रेल्वेच्या नियमित गाडय़ा सुरू करण्याचा विचार नाही. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता नियमित गाड्या सुरू होणार नाहीत. मात्र मागणीनुसार आवश्यक त्या गाड्या सुरू केल्या जातील.
आजपासून देशात अनलॉक 4 सुरू झाले आहे. सद्यस्थितीत, रेल्वे 30 विशेष राजधानीच्या गाड्यांच्या नावाखाली 230 एक्स्प्रेस गाड्या चालवत आहे. रेल्वे आणखी सुमारे 100 नवीन विशेष गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वेची राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच या नवीन विशेष गाड्या चालवल्या जातील.
मार्चपासून गाड्यांची वाहतूक बंद आहे
कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 22 मार्चपासून प्रवासी गाड्या आणि मेल / एक्स्प्रेस गाड्यांचे कामकाज थांबविण्यात आले. देशात प्रथमच रेल्वे सेवा थांबविण्यात आल्या आहेत. मात्र, देशात अनेक राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी नेण्यासाठी 1 मेपासून कामगारांसाठी विशेष गाड्या सुरु केल्या गेल्या. 12 मे पासून राजधानी मार्गावर काही विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आणि त्यानंतर 1 जूनपासून 100 जोड्या गाड्या सुरू करण्यात आल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.