नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज भेट घेणार होते ती भेट अखेर घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोण कोणत्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली याबाबत उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागलेली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती देखील दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar, and Cabinet Minister Ashok Chavan called on Prime Minister Narendra Modi
(Source: PMO) pic.twitter.com/eoycU4knRq
— ANI (@ANI) June 8, 2021
या मुद्द्यांवर चर्चा
बैठकीतल्या मुद्द्यांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षण, मागासवर्गीयांच्या बढती मधील आरक्षण, मेट्रो कार शेड साठी कांजुरमार्ग मधील जागेची उपलब्धता, जीएसटी परतावा, पिक विमा बद्दल मोदींशी चर्चा झाली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
मराठा आरक्षणावर चर्चा
अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय यातील महत्त्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षणाचा घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असं सांगितले असल्याचं यावेळी अशोक चव्हाण यांनी सांगितलं.