हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक पाठोपाठ गुजरातनंतर महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यामध्ये राज्यातील कोरोना परिस्थिती, नव्या ओमिक्रॉन वेरिएंटबाबत सविस्तर माहिती घेणार आहेत.
कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्याने खळबड उडाली आहे. सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून या रुग्णाची तब्बेत चांगली आहे. जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर महाराष्ट्रानेही सावधगिरी बाळगत प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता अखेर राज्यात पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचे निदान झाले आहे. ओमिक्रॉन या करोनाच्या नवा व्हेरियंटचा जास्तकरून लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात असल्याने लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
या पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील टास्क फोर्स व त्यामधील डॉक्टर, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी आज सविस्तर चर्चा करणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून राज्यातील कोरोना परिस्थिती, आताप्र्यत्न किती जननाची पहिला व दुसरा डोस घेतला, राज्यातील शाळांबाबत घेण्यात येणारा निर्णय आदी विषयांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.