हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे भाजपशी शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांकडून या ठिकाणी भेट दिली जात आहे. येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करीत त्यानॆ भरपाई देण्याचे आश्वासनही दिले जात आहे. तर दुसरीकडे एकमेकांवर आरोप, टीकाही केली जात आहे. आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला. यावेळी दरेकरांनी ट्विट करीत ठाकरेंच्या दौऱ्याच्या वेळेबाबत व येथील कार्यक्रमाबाबत टोला लगावला.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी! विरोधी पक्ष नेते…’तीन दिवस’ मुख्यमंत्री…’तीन तास’ विरोधी पक्ष नेते, कोकणवासीयांच्या बांधावर आणि उंबरठ्यावर जाऊन विचारपूस तर मुख्यमंत्र्यांचा, केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम'”‘ अशा शब्दात दरेकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!
विरोधी पक्ष नेते…
'तीन दिवस'मुख्यमंत्री…
'तीन तास'विरोधी पक्ष नेते,
कोकणवासीयांच्या बांधावर
उंबरठ्यावर जाऊन विचारपूसमुख्यमंत्र्यांचा,
केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम'— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यांचा पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. दुसरीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हेही याच जिल्ह्यात तीन दिसावसांपासून ठाण मांडून आहेत. यादरम्यान प्रवीण दरेकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देवगडला भेट दिली. यावेळी विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली.