परदेशातून येणाऱ्यांसाठी कडक नियमावली जाहीर, मुख्य सचिव चक्रवर्तींनी काढला ‘हा’ पहिला आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा घातक नवी व्हेरिएंट ओमिक्रॉन हा विषाणू आढळून आला आहे. तर आज कर्नाटकात याचे दोन रुग्ण आढळून आले असल्यामुळे राज्य सरकारने कडक पावले उचललली आहेत. राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी नवी नियमावली तयारी केली आहे. यापुढे परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे, असा असा आदेश राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी काढले आहे.

देबाशिष चक्रवर्ती यांनी मुख्य सचिवांचा नुकताच पदभार स्विकारला आहे. कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पहिला आदेश जारी केला. चक्रवर्ती यांनी जारी केलेल्या आदेशात म्हंटले आहे की, ‘आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला आपल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये प्रवासाचा तपशील द्यावा लागणार आहे. ही तपशील इम्मिग्रेशनला तपासावे लागेल जर माहिती खोटी आढळली तर त्या प्रवाशाच्या विरोधात डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत कारवाई केली जाईल.

ओमिक्रॉनने बाधित असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या देशांमधून जर प्रवासी आले तर त्यांना सात दिवस विलगीकरण ठेवावे लागणार आहे. दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांची rt-pcr टेस्ट केली जाईल आणि जर rt-pcr चाचणी जर पॉझिटिव्ह आली तर रुग्णालयात दाखल केले जाणार असल्याचे चक्रवर्ती यांनी आदेशात म्हंटले आहे.

Leave a Comment