सुटकेसवर झोपलेला चिमुकला; आई दोरीने ओढल कापत होती गावचा रस्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले अनेक कामगार आपल्या घरी परतत आहेत. हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांची अनेक मार्मिक छायाचित्रे आता सोशल मीडियातून समोर येत आहेत. कधी कुठेतरी ते बैलांसह बैलगाडीमध्ये आपल्या कुटुंबाला खेचत आहे, तर कुठे ते पेंढींसारखे सिमेंट मिक्सिंग ट्रकमध्ये बसून त्यांच्या गावाकडे निघालेले दिसून येतात. ज्यांना परत जाण्याचे साधन मिळाले ते भाग्यवान आहेत, मात्र ज्यांना काहीच मिळाले नाही असे लाखो लोक रस्त्यांवरून चालतच आपापल्या गावी जात आहेत. बुधवारीही अशाच एका कामगारांची एक तुकडी ताजनागिरी आग्रा येथे पंजाबहून परतून महोबाकडे निघाली होती. यामध्ये बऱ्याच महिला आणि मुलेही होती. या तुकडीमध्येच सामील असलेली एक आई आपल्या निरागस मुलाला सूटकेसवरच झोपवून चालत जात होती. याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे.

मूल सूटकेसवर झोपले आहे आणि आई ते दोरीने खेचत आहे
या व्हिडिओमध्ये,हे पाहता येते कि चाकं असलेल्या एका सुटकेसवर एक मूल झोपलेले आहे आणि ती सूटकेस त्याची आई दोरीने खेचत आहे. ती बाई सांगत आहे की आम्हांला महोबा (झांशी) येथे जायचे आहे. मजुरांची ही टीम पंजाबहूनच महोबाकडे रवाना झाली आहे. या टीममध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. या तुकडीत सामील असलेल्या धीरज नावाच्या एका व्यक्तीने ते पंजाबहून परत येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चालत चालतच आपण आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे असे तो म्हणाला.आम्ही जिथे रात्र होते तिथेच थांबतो. निघताना वाटेत काही लोकांनी रेशन दिले आहे, ते बनवून खातो असेही त्याने सांगितले.

इंदूर मधील बैलगाडीचा व्हिडिओ समोर आला
यापूर्वीही मध्य प्रदेशच्या इंदूरमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका माणसाला बैलासह बैलगाडी ओढताना दाखवले गेले. या व्हिडिओमध्ये दिसणारा राहुल नावाचा मजूर म्हणतो आहे की महूमध्ये त्याचे रोजंदारीचे काम गेले त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह इंदूर गावी जात आहे. खाण्यासाठी त्याला तिथे एक बैल विकाव लागला होता. बैलगाडीतील दुसऱ्या बैलाऐवजी कधीकधी तो स्वतः तर कधी त्याची बायको त्यामधून कुटुंबाला ओढतात.

मुख्यमंत्री योगी यांनी धीर धरण्याचे आवाहन केले आहे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगवेगळ्या राज्यातून परत आलेल्या कामगारांना संयम राखण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, जे काही आहेत त्यांनी आहे तेथेच थांबवावे. या कामगारांना बसेसद्वारे त्यांच्या गावी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या परंतु दररोज शेकडो कामगार पायी, सायकली किंवा ट्रकमधून परत येत असल्याचे चित्र समोर येते आहेत. एसपी सिटी बोत्रे रोहन प्रमोद यांनी फोनवर सांगितले की, कामगार कोठे आहे याची माहिती दिली तर प्रशासन तातडीने त्यांच्या राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था करते. बसची व्यवस्था करुन त्यांना त्यांच्या गावीही नेले जात आहे. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी शेल्टर होमचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.