दहशतवादी हल्ल्याबद्दल चीन भडकला, म्हणाला-“पाकिस्तान कारवाई करू शकत नसेल तर आम्ही सज्ज आहोत”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर कोहकिस्तान जिल्ह्यातील दासू परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या दासू धरण प्रकल्प साइटवरील बस स्फोटाबाबत चीनने कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेत नऊ चीनी नागरिक आणि फ्रंटियर कॉर्प्सचे दोन सैनिक यांच्यासह कमीतकमी 13 जण ठार झाले तर अन्य 39 जण जखमी झाले. स्फोटानंतर बस एका खोल दरीत कोसळली. या दहशतवादी हल्ल्यात चिनी नागरिकांच्या हत्येच्या घटनेपूर्वी यापूर्वी पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा देणारा चीन आता त्याच्यावर संतापलेला दिसतो आहे. या घटनेसंदर्भात चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिंगने एका ट्विटमध्ये पाकिस्तानच्या क्षमतांवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

शिजिंगने लिहिले की, ‘या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या भ्याड दहशतवाद्यांचा अद्याप खुलासा झालेला नाही. परंतु त्यांचा शोध नक्कीच लावला जाईल आणि त्यांचा अंत झाला पाहिजे. जर पाकिस्तानची क्षमता पुरेशी नसेल तर त्यांच्या परवानगीने चीनचे मिसाईल आणि स्पेशल फोर्सेस याचा शोध लावू शकतात.’

गुरुवारी पाकिस्तानने म्हटले होते की, प्राथमिक तपासणीत स्फोटकांचे प्रमाण सापडले असून यामागील दहशतवादी कारवाई नाकारता येत नाहीत. त्याचबरोबर चीनने गुरुवारीच म्हटले होते की,’ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानला स्पेशल टीम पाठवत आहे.’

या घटनेच्या कारणाबद्दल दोन्ही देशांचे मत वेगवेगळे आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला, तर चीनने त्याला हल्ला म्हणून संबोधले. त्याचबरोबर ‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, एक चिनी नागरिक बेपत्ता आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. मात्र, अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group