हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर होत असलेले अत्याचार, संजय राठोड प्रकरण यावरून आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात वसूल करणारे, बलात्कार करणारे, भूखंड हडप करणाऱ्यांना संरक्षण आहे. महिलांना संरक्षण नाही, पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यावर 16 फेब्रुवारीला गुन्हा दाखल होतो. 21 फेब्रुवारीला त्याला जामीन कसा मिळतो. महिलांचा आवाज दाबायचं काम होत आहे असे सांगत मुख्यमंत्री यांना कुणाच्या जीवावर बेस्ट सीएमचा अवार्ड मिळाला?, असा सवाल वाघ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, फक्त एक दिवस महिलांचा साजरा करून चालणार नाही. राज्यात वर्षभरात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडतात. कोविड सेंटरमध्येही महिलांवर बलात्कार झाले.
नागपुरात एमडी ड्रग्ज देत दोन दिवस मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका महिलेला अत्याचाराचा गुन्हा दाखल प्रकरणात तीस लाखांची लाच मागितली. गुलाबराव पाटलाने माफी मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी माफी देऊन पण टाकली, हे कसं काय? असा सवाल यावेळी वाघ यांनी उपस्थित केला आहे.