Wednesday, October 5, 2022

Buy now

चित्रा वाघ यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधत शिवसेनेला डिवचले; केलं ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल भाजपसोबत असलेली युती तोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर भाजपाकडून नितीशकुमार यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. ‘नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात,’असे ट्विट वाघ यांनी केले आहे.

भाजपसोबत फारकत घेत नितीश कुमार यांनी आरजेडी सोबत हातमिळवणी करत सत्तांतर केले आहे. यावर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत नितीशकुमार यांच्यावर टीका करत शिवसेनेला डिवचले आहे. त्यांच्या ट्विटमुळे आता नव्या वादाला सुरुवात तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सुशील मोदींच्या वक्तव्यावरूनही वाद

भाजपचे नेते सुशील मोदी यांनी आज सकाळी नितीशकुमार यांना इशारा डर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष फोडण्यामागे भाजपचा हात असल्याची कबुली दिली. ‘आरजेडीसोबत भाजपमध्ये असताना नितीश कुमार यांना मिळणारा आदर आता मिळणार नाही. भाजपकडे जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम भोगावे लागले,’असे मोदी यांनी म्हंटले.