Thursday, March 23, 2023

ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री; आता शिंदेनी दिले ‘हे’ जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता . त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा असा टोला त्यांनी लगावला. तसेच होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे, पण बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार पुढे घेऊन जायचे कंत्राट मी घेतले आहे असा पलटवार शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाचे कंत्राट मी घेतले आहे. राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट मी घेतले आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे आणि जनतेचे अश्रू फुटण्याचे कंत्राट मी घेतले आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख दूर करण्याचे कंत्राट मी घेतले आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार पुढे घेऊन जायचे कंत्राट मी घेतले आहे. आणि बहुजनांच्या सर्वांगींन विकासाचे कंत्राट मी घेतले आहे. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

- Advertisement -

दरम्यान, आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. तर मुंबईतील बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.