सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. सांगली जिल्ह्यातील दिघांची येते दरेकर हे बोलत होते. प्रवीण दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. यावेळी दरेकर यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, एकीकडे शरद पवार म्हणतात पंचनामे आणि प्रक्रिया करायला वेळ लागेल आणि दुसरीकडे म्हणतात केंद्र सरकारने तातडीची मदत घ्यावी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जात आहे, राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीचे निर्णय घेणे गरजेचे आहे. अस सांगून दरेकर पुढे म्हणाले, केवळ केंद्र सरकारवर बाजू ढकलून राज्य सरकारमधील नेते राजकारण करत आहेत. शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.