टीम हॅलो महाराष्ट्र | उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधन करताना कोरोनाशी लढताना महाराष्ट्र कुठल्या पातळीवर काम करतोय, आणि सरकारची पुढील वाटचाल काय असेल यावर थोडक्यात भाष्य केलं. पाहुयात त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे.
१) कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती, तज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभ्यासक एकत्र येऊन काम करणार.
२) आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात विशेष समिती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काम करणार.
३) आजाराचा सामना करण्यासाठी आणखी काय करता येईल, वेगळे काय उपाययोजना करता येतील यासाठी तज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेणार. यामध्ये रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, दीपक पारेख आणि इतर तज्ञ लोकांचा समावेश असणार.
४) परप्रांतीयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला धीर. संकटाचा सामना मिळून करु म्हणत तुमची काळजी घ्यायला मी तयार आहे असा दिला विश्वास. राहिलेल्या १९ दिवसांत सहकार्य अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला नक्कीच मोकळं केलं जाईल.
५) बीसीजी वॅक्सिन आणि प्लाझ्मा ट्रीटमेंटचा वापर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील.
६) कोरोनातून बऱ्या झालेल्या ६ महिन्यांच्या सनीत मोरे आणि ८३ वर्षीय वृद्धेचा उल्लेख करत, जर हे लढू शकतात आणि जिंकू शकतात तर आपणही जिंकूच असा विश्वास दिला.
७) महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबतच इतर पक्षीय, विशेषतः राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि इतर राज्यांतील नेते यांच्याशी वेळोवेळी सकारात्मक चर्चा सुरु असल्याची कबुली. संकटाशी सामना करताना राजकारण नको असा जरब बसवणारा संदेश देण्यात यशस्वी.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”