कोविड सेंटरमध्ये नर्सचा विनयभंग ; सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्यावेळी औरंगाबादमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिका चालकाने विनयभंग केला होता. अशाच प्रकारची एक घटना बीडमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्सचा तिच्याच सहकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित नर्सने आरोपी सहकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचे नाव अर्जुन अनंत फड असून तो परळी तालुक्यातील दौंडवाडी या ठिकाणी राहतो. आरोपी आणि पीडित नर्स मागच्या काही दिवसांपासून एकाच कोविड सेंटरमध्ये काम करत आहेत. आरोपी अर्जुन अनंत फड हा मागच्या दीड महिन्यापासून पीडित नर्सचा पाठलाग करत तिच्यावर पाळत ठेवत होता. मागच्या दीड महिन्यापासून आरोपी अर्जुन फड रात्री अपरात्री पीडितेच्या रुमचा दरवाजा वाजवून पळ काढत होता. यामुळे नर्सने घराचा दरवाजा कोण ठोठवत आहे हे पाहण्यासाठी तिने त्यावर पाळत ठेवली तेव्हा तिला रुग्णालयात सोबत काम करणारा अर्जुन दरवाजा ठोठावत असल्याचे आढळून आले.

आरोपी अर्जुन अनंत फड एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित नर्सच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडितेने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कोविड रुग्णालयात इमरजेन्सी अलार्म लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण अद्याप ही सुविधा राज्यातील कोविड रुग्णालयात बसवण्यात आलेली नाही.