सातारा | सातारा जिल्हा बॅंकेत आम्हाला अपेक्षा म्हणून महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला दोन किंवा तीन जागा मिळणे अपेक्षित होते. सांगली जिल्ह्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडी होणे गरजेचे होते. तरीही आमच्या सहकारी पक्षाने दुसरा घरोबा केला. तेव्हा त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हांला सर्व पर्याय मोकळे असल्याचा इशारा कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी दिला.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डावलेलेचे म्हटले. पक्षातील
आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव तालुक्याचा जिल्हा बॅंकेला काैल पाहिला आहे. आमच्या पक्षाने स्वताःच्या ताकदीवर माण आणि कोरेगावची जागा निवडूण आणलेली आहे. या दोन्ही जागा उघडपणाने शिवसेनेने निवडूण आणलेले आहेत. यापुढे आघाडी धर्म सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही खाली लढतोय, त्यामुळे आम्हांलाही मार्ग मोकळा आहे.