मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यामध्ये ४३ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रात मंत्रीपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते @MeNarayanRane साहेब, @KapilPatilMP जी, @DrBhagwatKarad जी आणि भारतीताई पवार या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन! केंद्रात काम करत असताना या सर्वांचा महाराष्ट्रासाठी अधिक फायदा होईल, अशी अपेक्षा! या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 7, 2021
केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून या सगळ्यांचे अभिनंदन केले आहे. रोहित पवार म्हणाले, ‘केंद्रात मंत्रीपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब,कपिल पाटील साहेब, डॉ. भागवत कराड साहेब आणि भारतीताई पवार या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन! केंद्रात काम करत असताना या सर्वांचा महाराष्ट्रासाठी अधिक फायदा होईल, अशी अपेक्षा! या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. आता या मंत्रिमंडळाचा देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.