सांगली | भाजपची एकहाती सत्ता असलेल्या सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर पदाची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपली होती. आज नवीन महापौर निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे “दिग्विजय सूर्यवंशी” यांची निवड झाली आहे. एका अर्थाने काँग्रेस, राष्ट्रवादीचा दिग्विजय झाला आहे.
अतिशय रंगतदार, धक्कादायक आणि उत्कंठा शिगेला पोहचलेल्या निवडणूकीत अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
एकूण मतदार ७८ मतदारांपैकी १ सदस्य मयत झाला आहे.त्यामुळे ७७ मतदार होते.यात २ मतदार तटस्थ राहिलेत. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मतं तर भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांना ३६ मतं मिळाली. महापौर म्हणून दिग्विजय सूर्यवंशी विजयी घोषित करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या निवडीत लक्ष घालत महापालिका मधील सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागली. अखेर जयंत पाटील यांनी टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केला आहे हेच आपण म्हणू शकतो.