कोरोना संकटात देशाला तुमचं ‘ते’ खोटं चांगलंच महागात पडलं; कोंग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला देशातील को रोना परिस्थितीसंदर्भात काँग्रेसनं १७ ऑगस्ट २०२० रोजीचा एक व्हिडीओ ट्विट केला असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील काही माहितीचा हवाला देण्यात आला आहे. “योग्य वेळी, योग्य निर्णय घेतले गेले. त्यामुळे भारतातील स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे सावरलेली आहे,” असा दावा मोदी यांनी केला आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत देशातील मृतांच्या संख्येच्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे.

या व्हिडीओ बरोबरच काँग्रेसनं मोदींवर निशाणाही साधत म्हटलं कि,
आईना भी देखकर तुम्हें,
चटक कर जाएगा टूट।
कोरोना के कहर में, देश को
भारी पड़ा तुम्हारा झूठ।

“तुम्हाला पाहून आरसाही तडे जाऊन तुटेल, कोरोनाच्या संकटात देशाला तुमचं खोटं चांगलंच महागात पडलं,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशात ५५ हजार ०७९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख २ हजार ७४२ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ५१ हजार ७९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment