हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमावी लागते. मग केंद्र सरकार करत आहे, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला न्यायालयाने सांगितले आहे. मात्र, केंद्र जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीकाही थोरात यांनी केला आहे
आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीत. लसीकरणासाठी केंद्राकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. लसीकरणासाठी असणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ होत आहे. अॅपचे नियोजन राज्याने केले पाहिजे, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.