शिवसेनेनं NDA ला पाठिंबा दिल्याने ‘मविआ’त बिघाडी?? काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

0
56
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणूकी साठी शिवसेनेनं NDA उमेदवार द्रौपदी मुर्मु याना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नाराज असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून ज्यांनी शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले, अशा परिस्थितीत शिवसेनेचा हा निर्णय अनाकलनीय आहे अस थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

 

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष असून त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here