हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेलया वादग्रस्त वक्तव्यावरून तिच्यावर सध्या टीका होऊ लागली आहे. या दरम्यान आज मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांच्या विधानाचा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला असून काहीही बरळणाऱ्याना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो. विक्रम गोखलेंना वाटत असेल तर त्यांनी राजकीय पक्षात सामोरं व्हावे, असा टोला चव्हाण यांनी कंगना आणि गोखले यांना लगावला आहे.
मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी आज अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वक्तव्याबाबत आपले मत मांडले. यावेळी त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यही केले. गोखले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोला लगावला. यावेळी चव्हाण म्हणाले की, विक्रम गुखले यांनी राजकारणावर बोलण्यापेक्षा एखाद्या पक्षात जावावं. त्यातून निवडणूक लढवावी, मते मिळवावीत. आणि त्यातून स्वता मुख्यमंत्री बनावे, पंतप्रधान करावे त्याचा मला आनंदच वाटेल, असा खोचक टोला चव्हाण यांनी यावेळी लगावला.
काय म्हणाले विक्रम गोखले?
कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. शिवसेना-भाजप युतीबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं, असे गोखले यांनी म्हंटले.