एमआयएम ही एक गाडी, भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं ते बोलते; काँग्रेस नेते नसीम खान यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आज महाविकास आघाडीश काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा सोडला. यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नसीम खान यांनी एमआयएमवर व भाजपवर घणाघाती टीका केली आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र आलेत. एमआयएम ने सर्व नियम मोडले असून ओवेसी स्वतः बॅरिस्टर आहेत. एमआयएम ही एक गाडी आहे. ज्यात भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं एनआयएम बोलते, अशा शब्दात खान यांनी टीका केली.

काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नसीम खान यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशात ज्या ठीकाणी निवडणुका येतात तेव्हा भाजप व एमएमआयमधील लोक तिथे जातात. ते मतांचं राजकारण करतात. येथेही हेच केले आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे हे लोकांना माहीत आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र आलेत.

आम्ही मुस्लीम आरक्षणाच्या बाबतीत आवाज उठवला, रस्त्यावर उतरलो तेव्हा यांचे आमदार, खासदार यांनी साथ दिली नाही, आत्ता कळवळा कशासाठी केला जात आहे. एमआयएमला इतकं महत्व देण्याची गरज नाही. तर राहूल गांधी कायदा मोडणार नाहीत त्यांना कायदा माहीत आहेत. ओवेसी बॅरिस्टर आहेत त्यांनी कायदा मोडला, राजस्थान मध्ये आज रॅली नाही रैला निघाला जनादेश वाढतो आहे. तर देशात आघाडी करण्यासाठी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी होऊच शकत नाही, हे अटळ सत्य असल्याचे खान यांनी सांगितले.

Leave a Comment