दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का?- बाळासाहेब थोरात

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला नागरिकांना दिवे लागण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून टीका केला आहे. लोकांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचं आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचं संकट अतिशय गंभीर होत चाललं आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात पंतप्रधान कधी टाळ्या वाजवायला सांगतात तर कधी दिवे लावायला सांगतात. लोकांना असं आवाहन देणे हे पंतप्रधानांचं काम आहे का? नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखं कधी बोलणार आहेत का? देशाच्या हिताचे निर्णय घेणार आहेत का? असा संतप्त सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. आज देशभर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांना धीर देणे, मेडिकल साहित्य पुरवणं याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले पाहिजे. राज्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. आता तरी त्यांनी थोडं गंभीर व्हायला पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की ५ एप्रिलला रात्री ९ वाजून ९ मिनिटांना आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here