काँग्रेसच्या या बड्या नेत्याने हातात बांधलं घड्याळ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. यावेळी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली विधानसभेचे स्पिकर राहिलेल्या योगानंद शास्री यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाची दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज. देशाच्या राजधानीत राष्ट्रीय पक्षाचे चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत. योगानंद शास्री यांच्या प्रवेशाबाबत गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरू होती. दिल्लीतील जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांन केली. त्यांचा स्वीकार त्यांनी केला. त्यांचे कार्यकर्तेही पक्षात आले आहेत, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत विदर्भ दौरा करणार आहेत. दौऱ्यादरम्यान नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांसोबत चर्चा करतील. विदर्भात भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता शरद पवार विमानाने नागपूर विमानतळावर पोहचतील. त्यानंतर ३ वाजता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील ४ वाजता पत्रकार परिषद घेतील आणि ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.