मुंबईला बदनाम करणाऱ्या कंगना राणावतचा ‘बोलविता धनी’ देवेंद्र फडणवीस व भाजप; काँग्रेसचा थेट आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत ही मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर घसरली. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या विरोधात कंगना राणावत करत असलेल्या वक्तव्यांमागे देवेंद्र फडणवीस व भाजप आहेत, असा थेट आरोप काँग्रेसनं केला आहे.

सचिन सावंत यांनी एकामागोमाग एक असे तीन ट्वीट केले आहेत. कंगना राणावत हिच्या ट्विटर हँडलचं अधिकृत नाव ‘कंगना टीम’ असं आहे. त्याचा संदर्भ देत सचिन सावंत यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ‘KanganaTeam म्हणजे दुसरंतिसरं कुणी नसून कंगना + भाजपचा आयटी सेल आहे. कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व मुंबईवर प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे, असा संताप सावंत यांनी व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. विवेक मोईत्रा यांच्यापासून ते राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूडशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. कदम यांची टेस्ट झाल्यास भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता हे कळेल व भाजपाचे ड्रग माफियाशी असलेले संबंधही उघड होतील,’ असा दावा सावंत यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.