कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय सर्वांशी सल्लामसलत करून घेतला असुन या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे हाल होणार नाही हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासादायक असल्याचे केले मत त्यांनी व्यक्त केले . गेल्यावर्षी ज्याप्रमाणे तडकाफडकी लॉकडाऊन झालं आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जो भयंकर त्रास झाला तो टाळायचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.
रोग हा फार नियंत्रणाच्या बाहेर जात असेल तर त्याला टाळण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करताना लोकांना पूर्वसूचना देऊन करणे चांगलेच आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटे पेक्ष्या मोठी आहे. आता तरी शासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कोरोनाचे नियम जनतेने पाळावे. सामाजिक अंतर ठेवावे आणि मास्क तर सर्वांनी घालावेच असे म्हणत 45 वर्षांवरील सर्वांनी कोरोना लस घ्यावी अस आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page