हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावताना देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे. जनतेची कामे करा,कोणत्याही परिस्थितीत जनतेचं दुःख दूर करा असे आवाहन राहुल गांधी यांनी केलं.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो सर्व राजकीय कामं सोडा आणि जनतेला मदत करा. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. काँग्रेसचा हाच धर्म आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
‘सिस्टम’ फ़ेल है इसलिए ये जनहित की बात करना ज़रूरी है:
इस संकट में देश को ज़िम्मेदार नागरिकों की ज़रूरत है। अपने कांग्रेस साथियों से मेरा अनुरोध है कि सारे राजनैतिक काम छोड़कर सिर्फ़ जन सहायता करें, हर तरह से देशवासियों का दुख दूर करें।
कांग्रेस परिवार का यही धर्म है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 25, 2021
देशात कोरोनाचा कहर सुरूच असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.