पवारांनी नव्हे, तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला अस विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केल्यानंतर राजकीय नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान, पवारांनी नव्हे तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला अस विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले म्हणाले, मी सन १९९८ साली शरद पवार यांच्यासोबत होतो. मात्र शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला हे म्हणणे योग्य नाही. उलट काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे अनंत गीते यांचा आरोप चूकीचा आहे.

शिवसेनेचे नेते अनंत गीत यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला असल्याने आता शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेला आपले भवितव्य उज्ज्वल करायचे असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहू नये. शिवसेना आणि भाजपने अडीच वर्षांच्या फार्म्युल्यावर एकमत करून एकत्र आले पाहिजे. असे करून राज्याच्या विकासाला चालना द्यावी, असे आठवले म्हणाले.

You might also like