हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच राजीनामा देण्याची मागणीही केली होती. त्याच्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे पटोले यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेलं , त्यांचा आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. आता निवडणुकीचा जो काही निकाल आला आहे त्याच स्वागतच करायला पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. त्यांच्या बोलण्यावर उत्तर नंतर आम्ही देऊ आता बोलणे योग्य वाटणार नाही.
आजच्या निवडणुकीत काँग्रेसने जो उमेदवार बदलला. त्याबद्दल सांगायचे झाले तर उमेदवार बदलणे ही आमची स्टेटजी होती त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.