अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात

अहमदनगर मध्ये राजकारण वेगळ्याच दिशेला जात असून आज अहमदनगर शहरात नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज नगर शहरामध्ये भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे यांचं काम करण्याचा निर्धार केला आहे.

अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीत सुजय विखे, त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी नगर तालुक्यांमध्ये सेना-काँग्रेस आघाडीला मदत केली होती. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-सेना महाआघाडी सुजय विखे यांना मदत करणार असल्याचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हाराळ यांनी स्पष्ट केलंय. या पाठिंब्यामुळे आता राष्ट्रवादी उमेदवार संग्राम जगताप यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत, मात्र नगरमध्ये जिल्हा काँग्रेसने थेट भाजपला मदत करण्याची घोषणा केल्याने बाळासाहेब थोरात गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. विखेंना मानणारा काँग्रेसचा गट भाजपच्या सुजय विखेंच्या पाठिशी उभे राहिले आहेत. काँग्रेसने थेट भाजपचे उमेदवार असलेल्या सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांनी आमचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले.त्यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी आमचा प्रचार करुन आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ज्या माणसाने आमची माणसं निवडून येण्यासाठी प्रयत्न केले, त्या माणसाच्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर